मनाच्या हिंदोळ्यावर

क्षमाभाव

क्षमा आपल्याला केव्हा मिळते जेव्हा आपल्या मनात केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो तेव्हा. पश्चाताप म्हणजे मनातल्या मनात केलेल्या चुकीची खंत वाटणे. मग ती चूक एखादं नातं तोडणार असो वा एखाद्याच्या मनाला दुखावणारी चूक. शेवटी चूक ती चूकच असते.
सॉरी, मला माफ करा माझ्या हातून चूक झाली. हे म्हणण्यात आपल्या मनातील भाव हा emotionally वाटला तर त्या माफीला अर्थ असतो.
क्षमा करताना आपल्यात कधीही अहंकार नसावा क्षमा जेव्हा करता तेव्हा तुमच्या मनाची क्षमता ही विशाल असते. समोरचा जर चूक करत असेल तर त्याची भावना समजून घेता त्याची भावना तुम्ही जपायला हवी. क्षमा करणे हे तुमच्या मनाचे मोठेपण समजले जाते. ज्यांचे मन सबल आहे तोच व्यक्ती क्षमेला पात्र असतो. कारण सबल मनाची व्यक्ती ही स्वतः ही. तेवढी संवेदनशील आणि सहनशक्तीची क्षमता बाळगते. ती नेहमी शांत असते.
हे मात्र तितकेच खरे क्षमा ही तेव्हाच योग्य असते जेव्हा समोरची व्यक्ती चूक ही जाणून बुजून करत नसेल तर मुद्दामून केलेली चूक ही चूक नाही तर त्या व्यक्तीची कुटिलता असते. तो एक अपराध समजला जातो. त्या चुकीला माफी नसते.

पल्लवी उधोजी

Leave a Reply