प्रवीण परदेशी केंद्रात राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त

मुंबई: १ जुलै-शासनाने मराठी भाषेचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केल्याच्या काही तासांनंतर प्रवीण परदेशी यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि ते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे सदस्य म्हणून प्रशासनात रुजू झाले. सेवानिवृत्तीचा काही काळ उरलेला असतानाच परदेशी यांची नियुक्ती मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली होती.
परदेशी आपल्या नव्या भूमिकेत केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सामायिक संसाधने तयार करण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये आणि प्रशिक्षण संस्था यांच्याशी समन्वय साधून देखरेख ठेवतील. पंतप्रधानांच्या सार्वजनिक मानव संसाधन परिषदेला वार्षिक क्षमता वाढवण्याच्या योजनांना मान्यता देण्याचे काम या आयोगातर्फे करण्यात येणार आहे. आयोगातर्फे मानवी संसाधन व्यवस्थापन आणि नागरी नोकरदारांसाठी क्षमता वाढवण्याच्या क्षेत्रात आवश्यक असलेल्या धोरणात बदल सुचवण्याचे काम करण्यात येणार आहे.
१९८५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी परदेशी हे २०१९ मध्ये मुंबईचे महानगरपालिका आयुक्त म्हणून रुजू झाले होते. तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासोबत मतभेदानंतर अचानक २०२० च्या मध्यावर त्यांची बदली झाली. यानंतर त्यांनी काही महिने सल्लागार म्हणून संयुक्त राष्ट्र संघात काम पाहिले.

Leave a Reply