आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतही वाढ

नवी दिल्ली: १ जुलै-पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच वाढले असताना, आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. १४ किलोच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात २५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता घरगुती अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ८३४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.
सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. याआधी १ मे रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. एप्रिल महिन्यात १० रुपयांनी दर कमी करण्यात आले होते, तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे दर वाढले होते. दरम्यान या वर्षभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात एकूण १४० रुपयांची वाढ झाली आहे.

Leave a Reply