दहावीचा निकाल १५जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता

मुंबई:३० जून- दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. दहावीचा निकाल १५जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज बुधवारी ही माहिती दिली. दहावीचा निकाल ९ वी आणि १० वीच्या घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील. तसेच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. जे विद्यार्थ्यी आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते.
निकाल असा बघा !
इयत्ता १०वी परीक्षा निकाल पाहण्यासाठी http://maharesults.nic.in, sscresult.mkcl.org, maharashtraeducation.com या संकेतस्थळांना भेट द्या. त्यानंतर संबंधित संकेतस्थलाच्या होमपेजवर SSC Examination Result 2021 या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या स्क्रिनवर नवे पेज उघडेल. त्यावर तुमचा क्रमांक आणि इतर तपशील भरा. सबमिट पर्यायावर क्लिक करा. तुमचा इयत्ता दहावी परीक्षा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसू लागेल. हा निकाल तुम्ही डाऊनलोड करु शकता आणि प्रिंटही काढू शकता.

Leave a Reply