सोमवारपासून आता पुन्हा नवे निर्बंध

नागपूर:२६ जून-कोविड-१९ च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरियंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका वाढला आहे. येत्या चार ते सहा आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध लादले जाणार असून, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी दुकानांच्या वेळाही आता दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहेत .
नागपुरात सोमवारी २८ जूनपासून नवीन नियम लागू केले जाणार आहे.. दरम्यान, नुकतेच निर्बंध हटविल्यामुळे बाजार आणि मॉलमधील उत्साह पुन्हा वाढला होता. मात्र, आता निर्बंध लागू केले जाणार आहे. राज्य सरकारचे आदेश आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक बोलावण्यात आली. यात सरकारचे नवे आदेश नागपुरात सोमवारपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या दिशा-निर्देशांचे शहरात पालन केले जाणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी पुन्हा नियमावली तयार केली जाईल. विशेष करून विवाह सोहळे आणि उपहारगृह, मॉल यासारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी केली जाईल. प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरती पथके नियुक्त केले जातील.

Leave a Reply