चिखलीत ७२ लाख रुपयांची व्यायामशाळा गेली चोरीला

बुलढाणा : २४ जून – बुलडाणा जिल्ह्यातील नगरपालिका अंतर्गत १३४ कोटी रुपयांचे विकास कामे करण्यात आले. मात्र ही सर्व कामे कागदोपत्री झाल्याची माहिती अधिकारात मागितलेल्या माहितिद्वारे उघड झाली. या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली होती.
जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तेव्हा जिल्ह्याधिकारी यांनी त्री सदस्य चौकशी समिती नेमुन चौकशीसाठी चिखली येथे पाठविले तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चिखली शहरातील बाबूलाल चौकात नगरपालिकेच्या वतीने ७२ लाख रुपयांची बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेची पाहणी केली. मात्र त्या ठिकाणी एका ट्रस्टच्या मालकीची जागा असून तिथे मुस्लिम समाजाचा शादी खाना बांधलेला आढळून आला आहे. चौकशी समितिने केलेल्या पाहणीत कुठेही व्यायाम शाळा आढळून आली नाही. त्यांमुळे नागरपालिकेची व्यायाम शाळा गेली कुठे असा प्रश्न चिखलीतील नागरिकांना पडला आहे. म्हणुन चिखली नगरपालिकेने ७२ लाख रुपयाची बांधलेली व्यायाम शाळा चोरीला गेली असल्याचे स्प्ष्ट झाले आहे.

Leave a Reply