वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

कुंपणावरचे महान !

कुठल्याही राजकीय वा सामाजिक प्रश्नावर ठाम भूमिका घेणे आणि ती
ठामपणे मांडणे कोणत्याही साहित्यिकाला सोपं नसतं !
प्रचंड आत्मिक बळ आणि धैर्य त्यासाठी असावं लागतं !
मोठमोठे मानसन्मान आणि पुरस्कार
यावर पाणी सोडावं लागतं !
साहित्य सम्मेलनांची निमंत्रणं,त्यांचं अध्यक्षपद ,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फेलोशिप, जीवन गौरव यांचा तर स्वप्नातही विचार करता येत नाही अशा लेखक, कवींना !
जन्मभर हेटाळणी,कुचेष्टा, आणि वंचितत्वाच्या सुगंधी जखमा घेऊनजगायची
तयारी ठेवावी लागते त्यांना !
जिवंतपणी तर नाहीच पण, मेल्यावरही कोणी नाव घेणार नाही!
यांचीही मानसिक तयारी ठेवावी लागते त्यांना !
बरं ज्यांच्यासाठी ते हे असं प्रवाहाविरुद्ध पोहतात त्यांनाही अजिबात कदर नसते अशा एकांड्या शिलेदारांची !
सावरकर, कवी गोविंद, पु भा भावे , भैरप्पा यांना काय दिलं देशाने हे
आपण पाहिले नाही काय ?
आणि म्हणूनच तटस्थ आणि सतत कुंपणावर बसलेलेच इथे महान ठरले हे खरे नाही काय ?

           कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply