ट्रक आणि क्रूझरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू , १० गंभीर जखमी

वर्धा : १९ जून – समुद्रपुर तालुक्यातील हैद्राबाद, नागपूर राष्ट्रीय महामार्ग ०७ वर रात्री एक वाजताच्या सुमारास जाम चौक येथे ट्रक ने कुझरला जबर घडक दिल्याने या भिषण अपघात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्र जाम पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, किशोर येरणे यांना या घटनेची माहिती मिळाली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून क्रूजर गाडी क्रमांक सी जी ०७ बि. एफ ८७४७ हि प्रवासी घेऊन हैदराबाद वरून जाम समुद्रपूर मार्गे छत्तीसगडला जात असताना जाम चौक नागपूर कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या अज्ञान ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक चालून कु्झरला जबर धडक दिल्याने गाडीची तीन पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सदर क्रूजर गाडी मधील रामू कलाल निषाद वय ४० वर्ष, बिरबल धलवु शाहू वय ३३ वर्ष, नरेश कुमार भानुराम करनेल वय ४० वर्ष, अंजली जयराम पटेल वय २५ वर्ष, सौ नीता नरेश करसेल वय ३० वर्ष, जानकीबाई पुनम शाहू वय ५० वर्ष, सौ रीमा निरव पटेल वय २५ वर्ष, उमेश नरेश करशील वय १० वर्ष, जयराम पटेल वय ५ वर्ष, भूमिका जयराम पाटील वय ४ वर्ष, आशु निरोत्तम पटेल वय २ वर्ष, व चालक किसन चन्द्रकुमार यादव वय २३ वर्ष हे सर्व राहणार रामपूर जिल्हा रांजणगाव छत्तीसगड सर्व जखमी व्यक्तिंचे नावे आहेत. या सर्व जखमींना हायवेवरील अंबूलस मध्ये टाकून उपचाराकरिता समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते यावेळी उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या रामू निशाद वय ४० वर्ष हा मरण पावला आहे. या घटनेची माहिती पोलीस स्टेशन समुद्रपूर यांना देण्यात आली तसेच रोडवरील छत्तीसग्रस्त्र क्रूजर गाडी हे ड्रायव्हर च्या साह्याने उचलून सुरक्षित स्थळी लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली पुढील तपास समुद्रपुर पोलिस करीत आहे.

Leave a Reply