छगन भुजबळांचे आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठी नौटंकी – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १६ जून – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ आंदोलन करणार आहेत, मात्र भुजबळ आंदोलनाच्या माध्यमातून खोट्या प्रसिद्धीसाठी नौटंकी करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्य सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय होता हे विसरून चालणार नाही. आपले अपयश लपवण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आंदोलनाची भाषा करत असल्याचा आरोप देखील बावनकुळे यांनी केला आहे.
छगन भुजबळ हे राज्याचे मंत्री आहे. सरकार मध्ये असताना त्यांनी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आयोग वेळेत नेमायला पाहिजे होता. इंपेरिकल डेटा तयार करून न्यायालयाला पुरवायला पाहिजे होता. मात्र, या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांमध्ये ती धमक नसल्याची घणाघाती बावनकुळे यांनी केली आहे. ओबीसीच्या राजकिय आरक्षणाची फाईल एक महिना मुख्यमंत्र्यांकडे पडून राहते आणि मंत्री आंदोलन करून ओबीसी जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. ओबीसी समाज मूर्ख नाही. सरकारमध्ये राहून मंत्री आंदोलन करतात हे दुर्दैवी आहे.
वीजबिल माफी देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाळावे. ते केंद्राकडे बोट दाखवत आहेत, मात्र या प्रकरणी केंद्र सरकारचे काय संबंध आहे. महावितरण ही राज्य सरकारची कंपनी असून नितीन राऊत यांनी नौटंकी बंद करावी आणि राज्याच्या बजेटमधून पैसे घेऊन वीज बिल माफी करावी. नितीन राऊत हे खरे सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते असतील, तर आपल्या शब्दाला जागतील असं देखील बावनकुळे म्हणाले.

Leave a Reply