सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

पीके – पापाचा धनी

अश्वमेधाच्या जेत्त्या वारूवर विजयाची एक एक निवडणूक पादाक्रांत करीत, उत्तुंग शिखरावर विराजमान आणि आता सक्रिय राजकारणाचे संकेत देत, सर्व पक्षांचा सारथी परिस्थितीने आणि आपल्या विजयी सामर्थ्याने सर्व राजकारणी मातब्बर आणि दिग्गजांना दाखवणारा, सरळ सरळ मुख्यमंत्री आवासातून काम करणारा, एक दिग्गज निवडणूक जेत्ता, हुकमी एक्का म्हणजे ,”प्रशांत किशोर”.
ह्याची यशोगाथा कथन करता करता मुलाखतकार थकुन जातात. ह्याच्या यशाचे गमक, कार्यप्रणाली , कार्यपद्धती जनतेसमोर आणण्याचा खूप प्रयत्न करतात. भरभरून स्तुती सुमनं उधळतात ह्याच्यावर आणि ह्या सर्वांमध्ये हरखून न जाता जमिनीवर भक्कम पाय रोवून, आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करून हसत हसत मुलाखतकारांना वळवंत, टोलवंत, सर्वांची मजा घेत घेत, सत्य शक्यतोवर अर्धवट ऊघड करून, वस्तुस्थिती झाकणारा, जेत्ता रणनिती कार प्रशांत किशोर.
परख जशी जौहरीला असते तद्वत २०११ च्या दरम्यान मोदींनी ह्याला परखत परखत २०१४ चा निवडणुकीचा रणनीती कार बनवला आणि मोदी प्रचंड बहुमताने निवडून आले आणि पंतप्रधान झाले. आणि “पीके” लाईम लाईट मध्ये आला.
त्यानंतर “Lateral Entry” ह्या मुद्यावर संस्था काढण्यास मोदींना उशीर होतोय ह्या कारणाने मोंदींपासुन फारकत घेतली आणि बिहार स्वतः चे जन्मराज्य विकासाच्या ध्येयाने प्रेरित, “Lateral Entry ” संस्था बिहारमध्ये काढण्याच्या अटीवर आणि स्वतः ही संस्था स्वायत्त अधिकाराने चालविण्याच्या अटीवर नितिश कुमार जेडीयू ला संलग्न झाला.
आधी हे समजणे आवश्यक आहे “Lateral Entry” काय प्रकार आहे. प्रशांत किशोर च्या मते भारतात असलेली सरकारी बुद्धिमत्ता कुचकामी आहे आणि व्यवस्थितपणे हाताळली जात नाही. आजवर “क्रांती” कुठल्याही सरकारी यंत्रणेने केली नाही. आणि गरज पडल्यास गैरसरकारी बुद्धिमत्तेचा वापर आणि विशेषज्ञ लोकांना भारताच्या भल्यासाठी वापर करून विकास करणे .
पी के च्या मते –
White Revolution by Kurien
Green Revolution by Swaminathan
Space, Missile by Abdul Kalam
Adhar Card by Nandan Nilkarni
ही सगळी क्रांतीकारी मंडळी IAS Cadet, Civil Services पास झालेली नव्हती तर एक विशेषज्ञ म्हणुन पादाक्रांत केलेले एक एक क्षेत्र आहे आणि अशा लोकांना भारताच्या भल्यासाठी “Lateral Entry” ने एकत्र आणून भारताचे भले करणे. हा उद्देश
आणि ह्या उद्देशाने प्रेरित पीके नितिश कुमार शी संलग्न झाला आणि पंतप्रधान झाल्यानंतर मोदींना हे काम करायला उशीर झाला तर इम्पेशंट होवून, मोदींपासुन विभक्त झाला. पण आता त्याने बिहार नितीश, तिथुनही पळ काढला.
नंतर नितिश-लालु निवडणूक जिंकले.
दुसरे ह्याचे एक विश्लेषण मनात घर करून जाते की भारताच्या राजकारणात सामान्य जनतेला थारा नाही. एका सर्वेक्षणानुसार
१९५२ लोकसभा ४० वर्षांच्या कमी असलेले खासदार २६% होते.
आज ते ७.६%आहेत. आणि ह्या ७.६% मध्ये ६७% पारंपरिक व्यवसायाने खासदार बनले आहेत. म्हणजे हळूहळू सर्व सत्ता ही पारंपरिक पद्धतीने वंशाकडे जाणार आणि सामान्य नागरिक वंचित राहणार. ह्यासाठी लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सामान्य जनांना राजकारणात येणे गरजेचे आहे हे पटवून देणारा , अगदी भारतीय लोकशाही ला दूरदृष्टीने अवलोकन करून त्याप्रमाणे बदल करण्याच्या दृष्टीने अधीर पीके.
भारतीय जनतेची रग ओळखणारा, निवडणुकीच्या वेळी जनतेच्या भावनांशी खेळणारा, त-हे त-हेच्या क्लृप्त्या लढवून जनतेच्या मतांना वळविणारा, फुकट पानी – बिजली चा प्रणेता, निवडणुकीत ला हुकमी एक्का अशा किती किती उपाध्या लोकं पीके ला जोडतात. कारण… कारण….. हा ज्या पक्षाची सुपारी घेतो…… त्या पक्षाला जिंकवून देतो……नऊ वर्षांच्या कारकिर्दीत फक्त एक मात….उत्तर प्रदेश… बाकी विजयाचा वारु उधळंत निघाला चौफेरू……
पीके एकदाही तोंड उघडत नाही की सुपारी कितीत घेतो? म्हणतो पैसा वैसा तो मै लेता नही, बस आॅफिस खर्चा निकल जाए…….ऐसा तो होने से रहा, या तो सरकार की रेड ना पडे या तो फिर ज्योत ज्योत जलाते चलो….सारा इन्कम छुपाते चलो……..इतकी नऊ वर्षे कोणी लष्कराच्या भाकऱ्या नाही भाजंत्, पीके.
पीके ला विस्तृत माहिती आहे भारताची की ह्याने कॉंग्रेस पंजाब, बिहार नितिश-लालु, बंगाल – ममता, दिल्ली – आप खासीराम कोतवाल ह्या सगळ्यांची निवडणुकीत सरशी करून दिली, ह्याबद्दल त्याचे अभिनंदन, ह्याचे वाईट नाही वाटंत.
वाईट ह्याचे वाटते, की मोदींना राज्या राज्याची प्रगती करायची होती त्यात पीके नी अडसर टाकला.
सर्व राज्य ज्यात पीके ची सरशी झाली ती राज्ये बघा सगळे हिंदू विरोधी तत्व… फक्त पैशाखातर भारत विरोधी पक्षांच्या हाती राज्य देवून, राज्याच्या विकासाला खिळ घालणारा धंदे वाईक – स्वार्थी पीके, लालू प्रसाद ला सपोर्ट करून नितीमत्ता गमावलेला पीके , हिंदू विरोधी पक्षांना सत्तेत आणणारा हिंदू विरोधी पीके. अरे ज्या लालूला भ्रष्टाचारासाठी शिक्षा झाली, त्याला तुम्ही सत्तेवर बसवायला निघाले तर नितीमत्तेचे धिंडवडे नाहीत काय? कुठला धंदा करताय पीके? फक्त निवडणुकीपुरते जनतेच्या भावनांशी खेळायचे…रोज टीव्ही त नाटकं करून ख-या पक्षाची खोटी बाजू दाखवून फसवायचे आणि आपली खरी बाजू लपवून .. खोटी बाजू खरी म्हणून गवगवा करायचा आणि एक फालतू सरकार राज्याच्या माथी मारुन…… राज्यातील जनतेला कसायांच्या हाती सोपवून….. जिंकल्याचा पेढा खात…… पळ काढायचा !!!!!!
जनतेला दिल्ली तील “खासीराम कोतवाल” बघा, फुकट बिजली पानी योजनेची उपज ह्याचीच् पीके ची. कोरोनाने मेलेल्यांच्या टाळु वरचं लोणी लाटणारा खासीराम. आॅक्सिजन ची काळाबाजारी करणारा कालरा सारखा ह्याचा निकटवर्ती लडबडलेला.
दिल्ली दंगे घडवणारे, हिंदुंच्या कत्तली करणारे दिल्ली राज्याला जिंकवणारा पीके. टॅक्स चा जनतेच्या घामाचा, पण दिल्लीत पाणी-बिजली फ्री करून – जनतेच्या घामाच्या पैशाची खिल्ली उडवणारा पीके.
कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाब, कॅनडातून रसद पुरवणारा दलालांची “किसान रॅली ” काढणारे राज्य जिंकवून भारत देशाशी घोर प्रतारणा करणारा पंजाब राज्य – जिंकून देणारा पीके.
महाराष्ट्र भाजपाशी शिवसेनेसोबत लढायला लावुन भाजपा शी काडीमोड घेवून हिंदू विरोधी, भारत विरोधी तत्वांशी सम्झौता करणारी संस्था म्हणजे पीके. आज महाराष्ट्रात जनतेचे जे हाल होत आहेत ते फक्त पीके च्या रणनिती मुळे. आज महाराष्ट्रात व्यवसायिक समाज “वाझेबॉंड” ला बाध्य आहे, आज अर्णव गोस्वामी ला घरातून उचलून घेऊन गेले ते तू दिलेल्या सरकार मुळे. आज केंद्र सरकारने पाठविलेले, जनतेचे धान्य गोर गरीबां पर्यंत पोहोचु देत नाही हे तू जिंकवून दिलेल्या सरकारमुळे. ह्या सगळ्यांचे शिव्याशाप घेणार कोण? अर्थात पीके. आज महाराष्ट्र अराजक माजले आहे त्याला कारण पीके.
बंगाल जिंकून देवून हिंदू आई बहिणींची अब्रू लुटणारी, हिंदुंच्या कत्तली करणारे सरकार, नवीन बांगलादेशमध्ये बंगालची योजना राबवणारी संस्था पीके.
पीके पैसा कमाया – भाजपा से राज्य छुडाया तो होने वाले भारत विरोधी कारवाई मे भी आपके पाप का सहभाग निश्चित तौरपे है और पीके इसकी जिम्मेदारी आपको लेनी पडेगी.
आज जी जी राज्ये पीके नी जिंकवून दिली त्या सर्व राज्यात मोठ्ठा झोल आणि भारी घोळ आहे. ही सारी भाजपा रहित राज्ये भ्रष्टाचारात गुंतली आहे, हिंदू विरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत, मुस्लिम धार्जिणे आहे आणि मुख्य म्हणजे केंद्रातून आलेला पैसा मदत, सामान्य जनांपर्यंत न पोहोचु देणारे अडसर आहेत.
ज्या मोदीने पीके तील गुण ओळखून त्याला स्वतःला ओळख दिली आज तोच पीके , पैसा कमविण्यासाठी मोदींना हारविण्याचा चंग बांधुन भारत विरोधी, हिंदू विरोधी, प्रगती रोधक घटकांना / पक्षांना जिंकवून तेथील जनतेचे हाल करीत आहे.
बंगाल हिंदूंची गति बघा. बंगाल मधला राज्यपालांचा दौरा आणि ती मुलगी जी राज्यपालाला विचारते आहे की जगायचं असेल तर हिंदू धर्म बदलून मुसलमान बनून जगावं लागेल का? पीके पैसा लेके – ममता को जिताके फरार…..ममता जिंकल्याच्या दुस-याच् दिवशी मुसलमानांनी हिंदुंची कत्तल केली. भाजपा आली असती तर असे काही झाले नसते – पण नाही… हिंदू पीके …. बंगाल को जिताके …… हिंदू की कत्तल हो रही थी …… तब जित का पेढा खाकर बंगाल से फरार हिंदू पीके…….. हिंदू पीके.. हिंदू बद्दल तुझं सामाजिक कर्तव्य नाही काय? ममता हिंदू विरोधी आहे माहिती असूनही हिंदू रक्षणासाठी काही तुझे कर्तव्य नाही काय?
ह्या सर्व राज्यात निवडणुकीच्या वेळी जनतेच्या भावनांशी खेळत, त्यांच्यातील मत परिवर्तन करीत, वेगवेगळे इश्यू चॅनलवर चालवत पीके तू ज्या कोणत्या राज्यांना सत्ताधीश दिला आहे त्यातील एका ही राज्यांतील जनता सुखी नाही. त्या राज्यातील तुझे हिंदू बांधव सुखी नाही. तू स्वतः हिंदू मात्र विजयाची नशा आणि उन्माद ह्या पायी आपल्याच हिंदू बांधवांचा बळी घ्यायला निघालास बंगालमध्ये. काय फायदा तुझ्या असल्या कार्याचा ज्याने तू आपले पोट भरतो आणि मुसलमान माणूस हिंदू लोकांना कापतो.
दिल्ली त खासीराम कोतवाल, निवडणूक जिंकल्याबरोबर मुसलमान लोकं हिंदू लोकावर हल्ला करतात. तर मग ह्या सर्व प्रकरणाला कारणीभूत कोण? दिल्ली तील हिंदू हत्याकांडाचा प्रणेता कोण? अर्थात ज्याने वाह्यात डावपेच खेळत दिल्ली ची सत्ता मिळवून दिली तो पीके.
पीके तुला लोकं आज यशस्वी समजंत् असतील तर भ्रमात राहू नकोस. ह्या सगळ्या राज्यातील अराजकाचा केंद्र बिंदू तू आहेस. सर्व राज्यातील जनतेच्या शिव्याशापांचा मानबिंदू तू आहेस. हिंदू बांधवांच्या कत्तली चे घोर पाप तुझ्या माथी आहे.
आणि मुख्य म्हणजे ज्या जौह-यानी तुला परखले, त्या मोदींच्या विरोधात तू आपली शक्ती दाखवलीस तो जगन्नियंता तुला कधी माफ नाही करणार. तुला जरी हा विजय वाटत असला तरी तुझ्यातला मानवतेचा तो -हास आहे. भारताची राज्याराज्यांत अधोगती करण्याचे पाप तुझ्या माथी आहे. त्या सर्व राज्यात होणा-या राष्ट्रविरोधी कारवायांचे पाप तुझ्या माथी आहे, हिंदुंच्या होणा-या कत्तली चे पाप तुझ्या माथी आहे.
तुझ्या वडिलांना तुला मोठ्या लोकातले चांगले गुण पाहायला शिकवले – मोदी मधले चांगले गुण तुला कळलेच् नाही,(गांधी सारखे – संदर्भ तुझी मुलाखत) आणि तू संत माणसाच्या सार्थ कार्यात रोडा बनला, नियती आणि जगन्नियंता तुला कधी माफ नाही करणार.
जसे दुस-यांमधले चांगले गुण बघतो तर एकदा स्वतः चे चिंतन कर – स्वतः मधले वाईट गुण बघ. स्वतः च्या यशासाठी राज्यांची नासाडी करण्याचं पातक तुझ्या माथी आहे.
आपण भ्रष्ट राजकारण्यांना मदत करंत, भ्रष्ट राजकारण्याला सत्ता सोपवित आहे, एवढी जाण तर तुला निश्चित आहे. मग हे सुद्धा पापात भागिदारी असण्याचे लक्षण आहे.
लोकांचे बसलेले शिव्याशाप तुझा विजयाचा वारु उधळून लावतील आणि तुझ्या घोडदौडीला लगाम बसेल. कर्माची फळं भोगावीच् लागतील, झालेल्या पापाचा धनी व्हावाच् लागेल पीके तुला. सुटका नाही.

भाई देवघरे

Leave a Reply