वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पाडून तर दाखवा !

अरे तुम्ही पाडून तर दाखवा !
एवढं सोपं नसते काही पाडणं !
मग तो पाऊस असो कि दात !
कि सरकारचं लोढणं !
पावसाचं म्हणाल तर तो आमचा प्रांत नाही
किंबहुना तो आमचा नाहीच !
पण नसला म्हणून काय झालं !
आम्ही पाडायचंच ठरवलं , तर ,
ढगात वाघनखं खुपसून , त्याचं पोट टराटरा फाडून पाऊस पाडणाऱ्याची औलाद आहे आमची !
आम्ही वाघ आहोत वाघ !
रंग हिरवा झाला, दात पडले आणि नखही गळले तरी ,
वाघनखांचं पेटंट तर आमच्याकडेच आहे !
त्याचं काय लोणचं घालायचं काय ?
तशी वेळच आली तर माझ्या शेतकरी राजासाठी तीही बाहेर काढायला मी कमी करणार नाही !
नाही म्हणजे नाहीच !
सांगा त्या विरोधकांना, त्या भाऊला , त्या दादांना , कि ,पाऊस पाडणं जसं
सोपं नाही , तसंच ,
सरकार पाडणंही सोपं नाही !
आणि गुळाला चिकटलेल्या मुंगळ्यांसारखे जेव्हा सत्ताधारी असतात
तेव्हा तर नाहीच नाही !

   कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply