शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, सॅनफ्लॅग स्टील कंपनीने प्रशिक्षणार्थ्यांना केले रुजू

भंडारा : ७ जून – सॅनफ्लॅग स्टील कंपनी प्रशासनाने कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी प्रशिक्षणार्थींना कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने व संपूर्ण देशात ताळेबंदी झाल्यामुळे शिकाऊ उमेदवारांना कामावरून काढले होते परिणामी प्रशिक्षणार्थींना एका वर्षाचा कालावधीचा प्रशिक्षण अर्थातच अनुभव मिळू शकले नाही यामुळे शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागले याप्रकरणाची माहिती अन्याग्रस्त प्रशिक्षणार्थ्यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली. सदर प्रकरणाची दखल घेत शिवसेनेने प्रशिक्षणार्थींना एक वर्षाचा प्रशिक्षण देण्यात यावा यासाठी सॅनफ्लॅग आयर्न स्टील कंपनीचे व्यवस्थापक सतीश श्रीवास्तव यांच्याकडे पत्र पाठवून सर्व शिकाऊ उमेदवारांना कामावर पुनःश्च बोलावून प्रशिक्षण देऊन त्यांच्या कालावधी पूर्ण करण्यात यावे व शिकाऊ उमेदवारी शासन निर्णय १९६१ कायद्या अंतर्गत विद्यावेतन देण्यात यावे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन आदेशीत करावे याकरिता सातत्याने पाठपुरावा केला तसेच महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना निवेदन पाठवून सदर प्रकरण निदर्शनास आणून दिले होते. अखेर सॅनफ्लॅग व्यवस्थापकाने याप्रकरणाची दखल घेऊन शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची ग्वाही दिली. प्रशिक्षणार्थीं उमेदवारांना शिवसेनेचा माध्यमातून न्याय मिळवून दिल्याने बेरोजगार युवकांनी शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख निखील कटारे, तुषार लांजेवार, शिकाऊ उमेदवार नेहाल साकुरे, सागर बिरोले, राम मसरे, समीर कारेमोरे, रतनकर सार्वे, पंकज मुळे, हितेश दिपटे, संदीप वाघमारे, गौरव पडोळे, मयूर वाहने, निखील पटले, सोनू बालपांडे, शांतानु सिंगाडे, पलाश सोनवाने उपस्थित होते.

Leave a Reply