मोदींनी ब्लु टिक पेक्षा लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावे – नवाब मलिक

मुंबई : ७ जून – सोशल मीडियाला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. पण, ‘ब्लू टीक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा मोदी सरकारने समजून घ्यावा. ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.
मोदी सरकारने ट्वीटर, फेसबुकसह सर्वच सोशल मीडियासाठी नियमावली तयारी केली आहे. पण, यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. ‘ट्वीरवर संपूर्ण भाजप आणि केंद्र सरकार ‘ब्लू टीक’ ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत असल्याचं परखड मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं.
तसंच, ट्वीटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.

Leave a Reply