कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या आई आणि मुलीसह पुतणीचाही नदीत बुडून मृत्यू

बीड : २ जून – गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगी आणि पुतणीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे घडली. पाण्यात बुडणाऱ्या पोटच्या मुलीला वाचविताना आई आणि चुलत बहिणीचे प्रयत्न अपुरे पडले यात तिघींचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रंजना भागवत गोडबोले (32) अर्चना गोडबोले (12 ) आणि पुतणी शीतल हनुमान गोडबोले (12) अशी बुडालेल्या तिघींची नावे आहेत. गेवराई तालुक्यातील मिरगाव येथील गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी मुलीला आणि पुतणीला सोबत घेऊन रंजना गोडबोले गेल्या होत्या. यावेळी मुलगी अर्चना पोहण्यासाठी पात्रात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडायला लागली. तिला वाचविण्यासाठी रंजना आणि शीतल यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु, तिघींही पाण्यात बुडाल्या याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदी पात्राकडे धाव घेऊन तिघींना बाहेर काढले. मात्र, त्यांचा यात मृत्यू झाला होता.
गोदावरी नदी पात्रात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कपडे धुवायला गेल्या महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. वाळू उपसा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी पात्रात खड्डे झाले आहेत. यामध्ये पाणी साचल्याने पाण्याचा अंदाज येत नाही म्हणून निष्पाप महिलांना जीव गमवावा लागत आहे. आज देखील अशीच घटना घडली.
मिरगाव गावाजवळ नदीपात्रात कपडे धुण्यासाठी नदी पात्रावर गेले. असता मुलगी पोहायला गेली, तिला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बहीण आणि आईचा देखील त्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply