नागपूरच्या मेयो रुग्णालयातील डॉक्टर अनिश्चित काळासाठी संपावर

नागपूर : १ जून – नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय तथा मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर आजपासून (1 जून) अनिश्चित काळासाठी सामूहिक रजेवर गेले आहेत. ‘शासनाने निवासी डॉक्टर्सला कोविड ड्युटीपासून मुक्त करावे. रुग्णालयात येणाऱ्या नॉनकोविड रुग्णांच्या उपचाराला गती द्यावी’, अशी मागणी मार्ड संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी हे सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले.
नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टरांनी आज सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. पोलीस चौकीपुढे निवासी डॉक्टर धरणे देत बसले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा मार्ड संघटनेकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. यामुळे मेयो रुग्णालयात केवळ 31 कोविड रुग्ण आहेत. 600 बेड हॉस्पिटलचे गुंतले आहेत. मागील काही दिवसांपासून डॉक्टरांना कोविड सेवेपासून मुक्त करण्याची मागणी केली जात आहे. पण याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासोबत 15 महिण्यापासून अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकवणी बंद आहे. इतर आजाराचे रुग्ण दवाखान्यात येत नाहीत. त्यामुळे त्या रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे. भितीपोटी अनेकजण कोविड रुग्णलायत असलेल्या परिसरात जाऊन उपचार घेण्यासाठी टाळत आहेत. यामुळे या रुग्णाची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे कोरोना वार्डच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची सोय उपल्बध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.या मागण्यांसाठी मागील महिन्याभरापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, आता जिल्हाधिकारी भेटण्यासाठी वेळ देत नसल्याचाही आरोप मार्ड संघटनेचे नागपूरचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल यांनी केला आहे. यावेळी अभिषेख केंद्रे, ईश्वर पाटील, यासह अन्य निवासी डॉक्टर उपस्थित होते.

Leave a Reply