माजी आमदार अनिल सोले यांचे फेक फेसबुक अकाउंट, ओळखीच्या व्यक्तींना पैसे मागितले

नागपूर : २४ मे – नागपुरात भाजपच्या माजी आमदाराचं फेक फेसबुक प्रोफाईल तयार करण्यात आलं. या बनावट अकाऊण्टवरुन ओळखीच्या व्यक्तींकडे पैसे मागण्यात आले. भाजप नेते अनिल सोले यांनी तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. फेसबुकवर ‘रिपोर्ट ॲंड ब्लॅाक’ या ऑप्शनचा वापर करण्याचं आवाहन सोशल मीडिया तज्ज्ञ करत आहेत.
नागपूरमधीस भाजप नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांचं फेक फेसबूक आयडी तयार करण्यात आलं होतं. त्यांच्या फेक आयडीवरुन मित्रांना पैसे मागण्यात आले. सोले यांनी तक्रार केल्यानंतर अनेकांची फसवणूक टळली.
गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारे फेक फेसबूक आयडी तयार करण्याचे प्रकार वाढले आहेत. तुमच्या आमच्या ओळखीतील अनेकांचे फेक आयडी तयार करुन सायबर गुन्हेगारांनी पैसे मागितल्याचे प्रकार घडत आहेत. नागपूर जिल्हयात गेल्या काही महिन्यात साधारण एक हजारच्या आसपास फेक आयडी तयार केल्याचं उघडकीस आलं आहे.
काही जण याबाबत तक्रार नोंदवतात, पण काही युजर्स तक्रार दाखल करायला जात नाहीत. त्यामुळेच फेसबूकवर फेक आयडी क्रिएट करणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण वाढलं आहे. अशा वेळेस फेसबूक वापरणाऱ्यांनी फेसबुकवरील ‘रिपोर्ट ॲंड ब्लॅाक’ या ऑप्शनचा वापर वाढवावा, असं आवाहन सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी केलं आहे.

Leave a Reply