वऱ्हाडी ठेचा …अनिल शेंडे

” टुलकिट “…!

एका लोकसत्ताक देशात
एक पंतप्रधान खूप लोकप्रिय झाले
हे पाहून विरोधकांच्या पोटात
मोठ्ठाले गोळे आले !
ते पंतप्रधान असेपर्यंत यांना
सत्तेची मलाई मिळणे शक्यच नव्हते
सत्तेवाचून ते सारे घोटाळेबाज
पाणीविहिन मास्यासारखे झाले होते!
म्हणून पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्यासाठी
त्यांनी एक षडयंत्र आखले !
देशी विदेशी सुपारीबाज पत्रकारांना
त्यांनी हाताशी धरले !
लाल आणि अर्ध्या हळकुंडात पिवळे , हाडुकचघळे विद्वानही (!)
त्यांनी सोबत घेतले !
साऱ्यांनी मिळून मग एक
” टुलकीट ” तयार केले !
पण हाय ! रे हाय !
एकाहून एक मोठमोठया अग्निपरीक्षा देणाऱ्या ,आणि
जहरी टीकेचे हलाहल पचवणार्या
त्या स्थितप्रज्ञ नरेन्द्रापुढे
हे “टुलकिट” अखेर फुस्केच ठरले !

  कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply