मोहफुलाच्या अवैध दारूनिर्मिती अड्ड्यावर धाड, साडेतीन लाखाचा मुद्देमाल नष्ट

भंडारा : १७ मे – वैनगंगा नदीकाठावरील करचखेडा बेटावर सुरू असलेल्या अवैध मोहफुलाच्या दारू निर्मिती अड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून जवळपास साडेतीन लाखाचा मुद्देमाल नष्ट केला, तर एकूण ५ लाख ३५ हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ७ आरोपींवर कारधा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मितीच्या धंद्याना उत आल्याने याविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव व अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण व कारधाचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी प्राप्त माहितीच्या आधारे अवैध दारू निर्मिती अड्यावर धडक कारवाई केली. कारधा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या करचखेडा बेटावर खाजगी बोटीच्या सहायाने पोलीस पथक पोहचले. यावेळी पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला. तर बेटावर १० लोखंडी ड्रम व २०० दोनशे मातीच्या मोठ्या मडक्यांमध्ये मोहफुल सडविण्यास टाकले होते. तसेच नदीकाठावर पाण्यामध्ये शंभर प्लॉस्टिक पिशंव्यामध्ये मोहफूल भरून असल्याचे दिसून आले. हा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून याची किंमती ५ लाख ३५ हजार रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी फरार आरोपी नंदाबाई भुरे (35), सिताबाई केवट (40), वनिता केवट (32), विनोद खंगार (35), निखील मेश्राम (35), प्रकाश वलथरे (35), चैतराम मडामे (55) सर्व राहणार करचखेडा यांच्याविरूध्द कारधा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply