वऱ्हाडी ठेचा … अनिल शेंडे

काही बोलायचे होते
पण बोलणार नाही
बोलण्याच्या सारखे गा
आता उरलेच नाही !

वाघ होता कालवरी
होती तुझी मोठी शान
आज परी काकाघरचा
म्हणतात तुज श्वान !

तुझ्या भगव्याचा होता
आम्हालाही अभिमान
आज परी हिरव्यांच्या तू
गातो अजानाचे गानं !

हिंदू झाला जागा आता
कावा उमगला तोही !
हिंदुहृदयसम्राटाचे
हृदय तुटु तुटु जाई !

कवी — अनिल शेंडे।

Leave a Reply