नातीने प्रियकराच्या मदतीने केला आजीचा खून, वृद्धेच्या खुनाचे गूढ उकलले

नागपूर : १६ मे – नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीततील ६१ वर्षीय महिलेच्या हत्येमागचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या आजीच्या अंगा खांद्यावर खेळून बालपण गेले, तिची हत्या नातीने चौघांच्या मदतीने केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. यातील एक नातीचा प्रियकर असल्याचा बोलले जात आहे. यामधील तिघांना ताब्यात घेतले असून नात आणि तिच्या प्रियकराचा शोध एमआयडीसी पोलीस घेत आहे. विजयाबाई पांडुरंग तिवलकर (वय ६१) असे मृत महिलेचे नाव आहे.
विजयाबाई या एसआरपीएफ कॅम्प पाठीमागील सत्यम नगरात राहत होत्या. त्या 14 मेला दुपारी 12 वाजताच्या सूमारस मोलकरीण आली तेव्हा विजयाबाई या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडून होत्या. पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी ते पोहचले. तेव्हा घटनेच्या जवळपास 10 ते 12 तास अगोदर म्हणजेच मध्यरात्री घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले. यासोबतच घरात कुठलाही विरोध किंवा भांडण न झाल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यावरून लक्षात आल्याने कोणीतरी सहज घरात येऊ जाणारा म्हणजेच ओळख परिचयाचा व्यक्ती असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
पोलिसांच्या तपासात विजया तिवलकर यांना एक मुलगा आणि दोन मुली आहे. 2017मध्ये राज्य राखीव पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या एकट्या राहत होत्या. यातील एका मुलीची मुलगी म्हणजे विजया यांची नात घरातुन कोणालाच न सांगता निघून प्रियकराच्या सोबत गेली असे बोलले जात आहे. यात कुटुंबाशी ते संपर्कात नव्हती. पण घरातील अन्य कोणाव्यक्तीवर संशयाची सुई जात नसल्याने नातीबद्दल माहिती पुढे आली. यात पोलिसांनी सूत्र फिरवत तिघांना ताब्यात घेतले. यात प्राथमिक तपासात विजया यांची हत्या नातीने प्रियकराच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासत पुढे आले आहे. यात विजया यांची नात आणि प्रियकराच्या शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी दिली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.
या हत्येत विजया यांची हत्या केल्यानंतर घरातून काही पैसे आणि सोन्याचे दागिने नेल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे या हत्येमागचे कारण हत्त्या करून मिळणारे पैसे आपसात वाटून घेण्याचा उद्देश असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply