वाशिममध्ये पकडली चोरटी दारू, १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

वाशीम : १३ मे – पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देशी, विदेशी व गावठी हातभट्टी दारु तसेच एका चारचाकी वाहनासह ११ लाख ९२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त करुन चार जणांविरुद्ध रिसोड व वाशीम पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केले. संचारबंदी काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारु आली कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ मे रोजी स्थागुशा चे पोनि शिवा ठाकरे यांनी गोपनिय माहिती मिळाली की, रिसोड शहरातून मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी दारुचा साठा विक्रीकरीता जात आहे. अशा माहितीवरुन त्यांनी रिसोड परिसरात पोलिस पथक नेमले. मिळालेल्या माहितीच्या आधारे रिसोड – मालेगाव रोडवरील बिबखेडा येथे सापळा लावला असता सायंकाळी ६ वाजता चे सुमारास रिसोडवरुन एक वाहन येतांना दिसले.
सदर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनामध्ये इंपेरिअल ब्ल्यु कंपनीची विदेशी दारु 10 पेटी व मॅकडॉवेल्स नं. 1 कंपनीची विदेशी दारु 10 पेटी अशी एकुण 1 लाख 48 हजार 800 रुपयाची विदेशी दारु मिळून आले. याबाबत वाहनचालक राजेश गोविंदराव काळमेघ रा. अकोला व त्याचा साथीदार गजानन जैताडे रा. वाशीम यांना विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. त्यावरुन विदेशी दारु व वाहन बोलेरो कॉम्पर एमएच 30 बीडी 3917 किंमत 10 लाख रुपये असा एकूण 11 लाख 48 हजार 800 रुपयाचा माल उपरोक्त आरोपीकडून जप्त करुन रिसोड पोस्टे ला दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसर्या एका घटनेत 13 मे रोजी ग्राम कृष्णा येथील गावठी हातभट्टीची दारु गाळणारे विलास फकिरा राठोड व जोतीराम जयराम जाधव यांच्या घरी छापा मारुन 70 लिटर गावठी हातभट्टीची दारु व 300 लिटर सडवा असा एकूण 44 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन उपरोक्त दोन्ही आरोपीविरुद्ध वाशम पोस्टेला गुन्हा दाखल केला.सदरची कारवाई जिपोअ वसंत परदेशी, अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थागुशा चे पोनि शिवा ठाकरे, सपोनि अतुल मोहनकर, सपोउपनि भगवान गावंडे, नारायण जाधव, किशोर चिंचोळकर, पोकॉ रेश्मा ठाकरे आदीच्या पथकाने केली.

Leave a Reply