संपादकीय संवाद – पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची केंद्र सरकारने तत्काळ दखल घ्यावी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला असल्याची माहिती येत आहे हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी घडवून आणला असून हा सरकार पुरस्कृत हिंसाचार असल्याचा आरोप राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने केला आहे.
भारतासारख्या लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीतील किंवा निवडणुकीनंतर मतमोजणीत हिंसाचार होणे हे लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारेच म्हणावे लागेल बहुतेक वेळा पराभूत उमेदवार आणि त्याचे समर्थक हिंसाचार किंवा आक्रोश करत असतात मात्र इथे विजयी पक्षाचे कार्यकर्तेच हिंसाचार करत असल्याचे बोलले जात आहे. हे खरे असेल तर हे प्रकरण गंभीरच म्हणावे लागेल त्यातही बांग्लादेशमधून आलेले मुस्लिम आणि म्यानमार मधून आलेले रोहिंग्या मुसलमान हेच हल्ला करण्यात आघाडीवर असल्याचा आरोप केला जातो आहे. आपल्या देशात दीर्घकाळ मोगलांची सत्ता होती त्यावेळी देशात छोटी छोटी राज्ये होती मोगल किंवा निजामांच्या सैनिकांनी हिंदू राजांच्या राज्यांवर हल्ला करायचा आणि ते राज्य जिंकून ताब्यात घेतले की जेत्या सैनिकांनी जिंकलेल्या राज्यातील नागरिकांची मालमत्ता लुटून न्यायाची अशी पद्धत त्या काळात होती त्यावेळी फक्त मालमत्ताच लुटायची असे नाही तर हिंदू परिवारातील स्त्रियांनाही पळवून नेले जायचे पराभूत सैन्यातील एखादा सरदार किंवा सेनापती मारला गेला तर त्याचे मुंडके तलवारीवर अडकवून सर्वदूर मिरवण्याचीही प्रथा त्याकाळात होती ही एक प्रकारची विकृतीच म्हणावी लागेल. आता लोकशाही व्यवस्थेत असा हिंसाचार होणे अपेक्षित नाही मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्याच घरांवर आणि दुकानांवर हल्ले केले जात आहेत आणि लुटालूट केली जात आहे. अशी माहिती मिळते आहे असे प्रकार लोकशाहीसाठी घातकच म्हणावे लागतील या प्रकाराविरुद्ध उद्या जर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले तर त्या राज्यात अराजकाचीच परिस्थिती निर्माण होईल ही परिस्थिती आटोक्यात आणणे मग कठीण जाईल.
या पार्श्वभूमीवर आता ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असल्यामुळे त्यांनी तत्काळ हे हिंसाचार थांबवले पाहिजेत जर हे त्यांना शक्य होणार नसेल तर राज्यपालांनी केंद्राकडे तसा अहवाल सादर करावा आणि केंद्राने राष्ट्रपती राजवट लावून लष्कराच्या मदतीने परिस्थिती आटोक्यात आणावी या सर्व प्रकारामुळे व्यथित होऊन भाजप कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलन सुरु केले आहे केंद्रातील सरकारने याची तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply