वनाधिकारी श्रीनिवास रेड्डी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अमरावती : १ मे – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला निलंबित मुख्य वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी याला आज (दि. 1 मे) धारणीच्या न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयायीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता दिपाली चव्हाण प्रकरनातील सह आरोपी असलेल्या श्रीनिवास रेड्डीच्या अडचणीत वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वीच त्याला धारणी पोलीसांनी नागपुरातून अटक केली होती. त्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयात दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, श्रीनिवास रेड्डीला जामीन मिळावा यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. पण, गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यभर पडसाद उमटले होते. रेड्डीच्या अटकेची मागणी जोर धरली होती. घटनेच्या 26 दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती.

Leave a Reply