कोविड रुग्णालयातील रुग्णाने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली

गोंदिया : ३० एप्रिल – गोंदिया येथील सहयोग हॉस्पीटलमधील कोविड रुग्ण उपचारासंदर्भात विविध नकारात्मक बाबींची चर्चा होत आहेत. अशात रुग्णाालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन कोविड बाधिताने उडी मारली. त्यामुळे रुग्णालयाच्या कामाकावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.येथील रिंग रोड मार्गावरील सहयोग हॉस्पीटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात मुळचा उस्मानाबाद येथील व सद्यस्थितीत बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा येथे राहणारा 42 वर्षीय कोरोना बाधित 8 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल झाला होता.
दरम्यान त्यानेे 28 एप्रिल रोजी रुग्णालयाच्या तिसर्या इमारतीमधून खाली उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद घुगे घटनास्थळी पोहोचले व चौकशी सुरु केली. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाद्वारे रुग्णालयात नियुक्त नोडल अधिकार्याशी संपर्क केला असता त्यांनी आपल्याची घटनेची माहिती मिळाली असून आपण स्वतः कोरोना बाधित असल्याने रुग्णालयात नसल्याने पूर्ण माहिती नसल्याचे सांगितले.

Leave a Reply