प्रियकराने विवाहितेचा केला विनयभंग

नागपूर : २८ एप्रिल – गिट्टीखदान हद्दीत प्रियकराने विवाहित प्रेयसीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी किशोर मनोहर घाडगे (२५) हा शेतकरी आहे. त्याचे गिट्टीखदान हद्दीत राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण, डिसेंबर २0२0 मध्ये मुलीच्या घरच्यांनी तिचे खासगी कंपनीत काम करणाऱ्या युवकाशी लग्न लावून दिले. यामुळे किशोर चांगलाच संतापला होता. प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने तिचे लग्न तुटावे आणि ती त्याच्याकडे परत यावी, यासाठी त्याने त्या दोघांचे अंतरंगातले फोटो तिच्या नवऱ्याला आणि इतर नातेवाईकांना पाठविले. याप्रकरणी विवाहित प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आरोपी प्रियकरावर विनयभंगाचा गुन्हा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply