पत्रभेटच्या शिबिराचे विदेशातही ‘उड्डाण’, उन्हाळी शिबिराचा झाला थाटात समारोप

नागपूर : २८ एप्रिल – कोरोना महामारीमुळे वर्षभर बालमित्र शाळा, शाळेतील मित्र, दंगा मस्ती यापासून दूर राहिले. घरात बसून कंटाळलेल्या या बालमित्रांसाठी पत्रभेटच्यातवतीने ‘उड्डाण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला देशविदेशातील बालमित्रांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पत्रभेटच्यावतीने ‘उड्डाण’ या उन्हाळी बाल शिबिराचे 13 ते 25 एप्रिल दरम्यान आभासी पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून झालेल्या‍ या शिबिराचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प. पू. सद्गुरूदास महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या शिबिरात भारतासह अमेरिका, सिंगापूर, नेपाळ मस्कत, सोहर, कुवैत, अबुधाबी, व्हिएतनाम इत्यादी देशातून सुमारे 500 बालमित्र सहभागी झाले होते.
डॉ. अनुराधा हरकरे, विद्या तळणीकर, केतन म्हात्रे, पीयूष उद्धव, अनघा पंडित, देविका मार्डीकर, गुरूराज मिर्जी, संपदा तुंबडे अशा अनेक मान्यवरांचे बालमित्रांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी मुलांना रामरक्षा, मारोती स्‍तोत्र, मनाचे श्लोक इत्यादी शिकवले तर महापुरूषांचे चरित्र सांगून त्यांच्यात संस्कार रूजवण्यातचे काम केले. शिबिरात बालमित्रांनी मन, मेंदू व मनगट बळकट करण्याचा संकल्प केला.
उपासनेशिवाय धैर्य येत नाही. शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणसाठी सतत त्यांचा झेंडा फडकवत ठेवला तसा आपणही सर्वांनी धर्माच्या उपासनेचा झेंडा सतत फडकवत ठेवायचा आहे, असा संदेश शिबिरादरम्यान प.पू. सद्गुरूदास महाराज महाराजांनी बालमित्रांना दिला. सर्व बालमित्रांनी स्‍वत:च्‍या आवाजातील रामरक्षा, मारोती स्‍तोत्र यांनी मोठ्या प्रमाणात पाठवले. सर्व शिबिरार्थींना प. पू. सद्गुरूदास महाराजांच्‍या स्‍वाक्षरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात येणार आहेत.
समारोपीय कार्यक्रमाची सुरूवात अजय देवगांवकर यांच्या हनुमान चालिसेने झाली. रमण टेकाडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रणोती रोटीवार यांनी प्रास्ताविकातून शिबिराची माहिती दिली. गुजरातचे मोहन बरबडे यांनी आभार प्रदर्शन केले. देविका मार्डीकर यांच्‍या पसायदानाने समारोपीय कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply