राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनाने निधन

नागपूर : २५ एप्रिल – राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेता संजय देवतळे यांचे रविवार, 25 एप्रिलला दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास नागपूर येथील एका खाजगी रूग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 58 वर्षाचे होते. दोन आठवड्यापूर्वी ते कोरोनाबाधित झाल्याने त्यांना 14 एप्रिलला नागपूरच्या सक्करदरा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती व एकदोन दिवसात त्यांना रूग्णालयातून सुट्टीही मिळणार होती. परंतु, शनिवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या शरिरातील प्राणवायूचे प्रमाण बरेच खाली आले व रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. परंतु, रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply