राजकीय उद्धिष्ट सध्या करण्यासाठीच अनिल देशमुखांची सीबीआयद्वारे झाडाझडती

मुंबईचे : २४ एप्रिल – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर याप्रकरणी आता सीबीआयने देशमुख यांच्यासह या प्रकरणात संबंधित असलेल्या इतरांवर गुन्हा दाखल केला असून, देशमुख यांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. देशमुख यांच्या घर आणि कार्यालयात सुरू असलेल्या छापेमारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नामोल्लेख न करता भाजपाला सुनावलं आहे. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच सीबीआयचं धाडसत्र सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयांत सीबीआयकडून झाडाझडती सुरू असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला व सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण ४ जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. मा. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले? याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टिलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे,” असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
“या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो,” असं म्हणत पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.

Leave a Reply