अकोला जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के


अकोला : १८ एप्रिल – अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर शहरांतील गुजराथीपुरा कासारखेड अकोला नाका, घन कचरा प्लँन्ट आदी ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ही घटना काल दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली. ही माहिती अकोला वेधशाळेने दिली आहे.
अकोला शहरापासून पश्चिमेस १९ किलो मीटर अंतरावर असलेल्या बाळापूर शहरात हे ३ रिक्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. याबाबत गुजराथीपुरा येथील माजी नगरसेवक प्रितेंश गुजराथी यांचाकडुन भूकंपा विषयी माहिती जाणवुन घेतांना त्यांनी सांगितले की

भूकंपाचे सोम्य धक्के बसणे सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम घरांमध्ये गडगड असा आवाज ऐकू येऊ लागला. खिडक्यांच्या तावदानांचा, तसेच दरवाजांचांचा सुद्धा आवाज होऊ लागला, अशी माहिती गुजराथीपुरा येथील माजी नगरसेवक प्रितेश गुजराथी यांनी माहिती देताना सांगितले. याबाबात परिसरातील नागरिकांना माहिती विचारली असता त्यांनीही या घटनेला दुजोरा दिला.

याचबरोबर बाळापूर नगर परिषदेचे मुख्यधिकारी गोपीचंद पवार यांनी देखील या भूकंपाबाबत माहिती दिली. या भुकंपाचाकेंद बिंदू गायगांव हा असून बाळापूर शहरातील अकोला नाका, गुजराथीपुरा , कासारखेड, घन कचरा प्लँन्ट, महामार्ग पोलिस केंद्र आदी ठिकाणी सौम्य धक्के जाणवल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या घटनेने शहरातील जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन गोपीचंद पवार यांनी केले आहे.

Leave a Reply