अकोल्यात तहसिलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

अकोला : १७ एप्रिल -लाच प्रकरणातील साखळी तोंडण्याचे काम अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. पुरवठा निरीक्षकाच्या अटकेनंतर आज तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे यास अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महसुल प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे. अकोला तहसिलदार असलेले विजय लोखंडे यांच्याकडे खनिकर्म विभागाचा देखील प्रभार असून त्यांनी त्या विभागात देखील काही गैरप्रकार केले काय याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेण्याची गरज असल्याची चर्चा महसुल विभागात होती
पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर याने साडेपाच हजारांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी ७ एप्रिल रोजी एसीबीने ताब्यात घेतले होते. अटकेनंतर त्याची चौकशी केल्यावर अकोल्याचे तहसिलदार या प्रकरणात लिप्त असल्याचे चौकशीअंती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला आढळले त्यामुळे आज तहसिलदार विजय सुखदेव लोखंडे याला अटक करण्यात आली
गोरगरीबांना मोफत धान्य वाटप योजनेत स्वस्त धान्य दूकानदाराचा मोबदला देण्यासाठी साडेपाच हजारांची लाच पुरवठा निरीक्षक निलेश भास्कर कळसकर याने केली होती. त्याने लाच घेतली नव्हती पण] इतर पुराव्याच्या आधारे त्याला लाच विभागाने अटक केली होती. पोलिस कोठडीत चौकशी व इतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे तहसिलदार विजय लोखंडे यास आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. गुन्ह्याच्या तपासातील नोंदी व दस्तऐवजावरुन तहसिलदार विजय लोखंडे याने पदाचा दूरुपयोग केल्याचे व गैरफायदा मिळविण्याच्या उद्देशाने कर्तव्य कसुर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आले. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक आय व्ही चव्हाण यांनी दिली

Leave a Reply