ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे – बच्चू कडूंची नवी योजना

अमरावती : १६ एप्रिल – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार, विधवा, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांच्या पाठिशी राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू उभे ठाकले आहेत. ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे हा अनोखा उपक्रम राबविला जात असून ही योजना मतदारसंघात सुरू झाली आहे. पतीच्या निधनानंतर कुटूंबाचा चरितार्थ चालविण्याची वेळ या महिलांवर आली पण नांगरणी, वखरणी, व्हि पास, पंजी व पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून अशा विवंचनेत या महिला भगिनी असतात. नेमकी ही बाब राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या लक्षात येताच अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीदिनी ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे ही योजना आखण्यात आली. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराआई कडू यांच्या वाढदिवशी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या योजनेची नोंदणी अचलपूर विधानसभा मतदारसंघात सुरू झाली होती व अजुनही सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 100 एकर पेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून देण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी मतदारसंघातील ही कामे पूर्ण करून त्या महिला व त्यांच्या कुटूंबियांसाठी एक आधारवडाची भूमिका राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू बजावत आहेत.

Leave a Reply