भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कोरोना

मुंबई : १५ एप्रिल – राज्यात कोरोनाबाधित (रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे आशिष शेलार यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द आशिष शेलार यांनीच आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती ट्वीट करून दिली आहे.माझी कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेत आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.तसंच, माझ्या संपर्कात जे कुणी कार्यकर्ते, पदाधिकारी असतील त्यांनी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी, कोरोनाचे लक्षण जाणवल्यास चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही आशिष शेलार यांनी केलं. भाजपचे आमदार मंगलप्रसाद लोढा यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. लोढा यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आढळून आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून ट्वीट करून लोढा यांना आरोग्याची काळजी घेण्यास सल्ला दिला होता.दरम्यान,राज्य सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 39,624 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आजपर्यंत एकूण 29,05,721कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.21 एवढे झाले आहे. आज राज्यात 58,952 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 278 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,28,02,200 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 35,78,160 (15.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,55,206 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 28,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,12,070 रुग्ण ऍक्टीव्ह आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात 50 हजारांच्या पुढे रुग्ण आढळून आले आहे.

Leave a Reply