नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरिक बदल्या

नागपूर : १३ एप्रिल – नागपूर शहर पोलिस दलात पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशान्वये आंतरिक बदल करण्यात आले आहेत. यात कोराडी आणि वाठोडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचा समावेश आहे.
सोमवारी जारी करण्यात आलेल्या आंतरिक बदल्यांच्या आदेशान्वये मानकापूर पोलिसठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रिष्णा के. शिंदे यांना कोराडी पोलिस ठाण्यात बदलीवर पाठविण्यात आले आहे. कोराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर.बी. पुकळे यांना आर्थिक गुन्हे शाखेत पाठविण्यात आले आहे. कोराडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयंत गंगावने यांना इमामवाडा पोलिस ठाण्यात रिक्तपदी पाठविण्यात आले आहे. वाहतूक शाखेच्या महिला पोलिस निरीक्षक आशालता जी. खापरे यांना वाठोडा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए.पी. ताकसांडे यांच्या जागी पाठविण्यात आले आहे. वाठोडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पी. ताकसांडे यांना नियंत्रण कक्षात पाठविले असून त्यांच्याकडे पोलिस आयुक्तांचे वाचक याचा तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे.

Leave a Reply