तीन ठिकाणी धाड टाकून ४५ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

नागपूर : १३ एप्रिल – गुन्हे शाखा युनिट क्र. १ च्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाठोडा हद्दीत तीन ठिकाणी धाड कारवाई करून ४५ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा माल जप्त केला. याप्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट क्र.१ ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने वाठोडा हद्दीत प्लॉट क्र. ४७, धनंजय सोसायटी, अनमोलनगर येथे घरमालक सुनीता एकनाथ धावडे (४७), अंकित मालू रा. खंडवाणी टाऊन, स्वामी नारायण मंदिर आणि अभिषेक बजाज रा. अनमोलनगर यांनी भाड्याने दिलेल्या ठिकाणी छापा कारवाई केली. कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला तांबाखूचा साठा मिळाला. तेथे असलेल्या बोलेरो आणि टाटा एस गाडीची पाहणी केली असता, त्यामध्येसुद्धा सुगंधित तंबाखूच्या १३६ प्लास्टिक बोरी एकूण किं. ३५,५५,९४0 रु. आणि दोन्ही वाहन किं. ७ लाख रु., असा एकूण ४५,५५,९४0 रु.चा मुद्देमाल मिळून आला. हा तंबाखूचा साठा आरोपी स्नेहल जगदीश विटनकर (३२) रा. पुनापूर रोड, भवानीनगर, अतुल दिलीप शेंडे (३२) रा. भवानीनगर, जुबेर इस्माईल शेख (३१) रा. भांडेवाडी यांच्याकडून जप्त करण्यात आला. हा माल अंकित मालू आणि अभिषेक बजाज यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply